'त्या'* शाळेतील मुख्याध्यापक आणि संस्था चालकांवर कारवाई करा.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 29 अगस्त 2018

'त्या'* शाळेतील मुख्याध्यापक आणि संस्था चालकांवर कारवाई करा..


स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी.


जिंतूर प्रतिनिधी
दि:- 29/08/2018.


जिंतूर शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या,उस्मानपूरा भागातील अबुबकर सिद्दिक ऊर्दू प्रा.शाळेची जुनी माती बांधकाम असलेली भिंत कोसळल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली होती. शिकवणी वर्ग चालू असतानाच हा प्रकार घडला होता, सुदैवाने ही भिंत बाहेरील रस्त्यावर कोसळल्यामुळे वर्गातील निष्पाप चिमुकल्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. शाळा व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे मोठी दुर्घटना थोडक्यातुन टळली असली तरी, शाळेच्या मुख्याध्यापकां प्रसार माध्यमां पुढे बेजबाबदार वक्तव्य केल्याने सध्या पालक आणि स्थानिक नागरिकां कडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेत आठ ते दहा विद्यार्थी जख्मी झालेले असताना. या घटनेत एकही विद्यार्थी जखमी नसल्याचे मुख्याध्यापक माबुद कुरेशी यांनी प्रसारमाध्यमातून सांगितले होते. या प्रकाराची वास्तविकता पुढे यावी यासाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष हारुण पठाण यांनी जिंतूर गट शिक्षणाधिकारी यांना आज (दि.२९) रोजी निवेदन देऊन दोषींवर  कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अबुबकर सिद्दिक ऊर्दू प्रा.शाळेची इमारत हि ५० ते ६० वर्षांपुर्वीचे जूने बांधकाम असल्यामुळे हि इमारत जीर्ण खिळखिळ झालेली आहे. या शाळेत मुस्लिम समाजातील गोरगरीब घरातील विद्यार्थी  शिक्षण हे घेत आहेत.

या शाळेत सध्या इयत्ता १ ते ७ वी च्या वर्गात जवळपास ४०० विद्यार्थी संख्या असुन, या सर्व विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे.

या शाळेच्या इमारतीचे बांधकाम एका पिढीपूर्वीचे असून, या शाळेच्या भिंती जीर्ण झाल्याचे जाणवत आहे.  या शाळेची सखोल चौकशी करून  तज्ञ अभियंत्या द्वारे  सर्व इमारतीची  तपासणी करावी तथा शाळेचे मुख्याध्यापक व संस्था चालक मंडळी यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी, अन्यथा पंधरा दिवसांनंतर नसता लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलन करावे लागेल असे गट शिक्षणधीकारी यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शहरात ईतकी मोठी दुर्घटना घडुन आज तिसरा दिवस उजाडला तरी, अद्याप पर्यंत जिंतूर पं.स. गटशिक्षणाधिकारी कार्यालया कडून गटशिक्षणाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी अथवा स्थानिक प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या शाळेला भेट दिलेली नाही. त्यामुळे प्रशासन या घटने बद्दल किती गंभीर आहे, याची जाणीव होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें