सेलू / प्रतिनिधी
येथील विवेकानंद विद्यालयात भाऊ - बहिणीच्या अतूट नात्याचा सण असलेला रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता १ ली ते ४ चौथी च्या मुलींनी स्वतः राख्या तयार केल्या व विद्यार्थ्यांना बांधल्या. काही मुलींनी वृक्षाला आपला भाऊ मानून त्याला राखी बांधली . वृक्षवल्ली आम्हा सोयरे यानुसार वृक्षाचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे , हा संदेश देण्यात आला.
श्री.विनोद मंडलिक यांनी रक्षाबंधनाचे महत्व विशद केले. मु.अ. बळवंत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतसाठी रागिणी जकाते , दीपाली पवार,नेत्रा ढाले , काशिनाथ पांचाळ, चक्रधर वाघमारे , अभिषेक राजूरकर, चंदू कव्हळे ,सेवक दत्ता गिरी यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें