अवैध व्यवसायिकांमध्ये घबराट.
भोकरदन प्रतिनिधी : मालखेडा येथे भोकरदन -सिल्लोड रोडवरील हॉटेलच्या पाठीमागे लाखो रुपयांच्या जुगार अड्डयावर भोकरदन पोलिसांनी मंगळवारी दि.२८ रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास छापा टाकला .त्यात १३ जुगरींना ताब्यात घेण्यात आले असून,त्यांच्याकडून तीन लाख ८८५८१ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.मालखेडा पाटीजवळ हॉटेलच्या पाठीमागे पत्त्याचा जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी छापा टाकून तेरा जणांना ताब्यात घेतले .त्यांच्या जवळील दुचाकी वाहनेसह एकूण तीन लाख ८८५८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शेख शफीक बुढण(रा.सिल्लोड),गणेश शांताराम डकले(सिल्लोड),अनिल रामराव गाढेकर(मालखेडा),अ.लतीफअ.रहीम(सिल्लोड),रामदास गावकर(भोकरदन),सूर्यभान कचरू गाढेकर(सिल्लोड),उध्दराव रघुनाथ खराते(सिल्लोड),शेख नसीर सरदार(पळसखेळा मूर्तड),शशिकांत अप्पराव सावंत (सिल्लोड),संजय बाजीराव जीवरग(भवन सिल्लोड),लक्षीमण सखाराम सोनुने(पळसखेडा मूर्तड भोकरदन)माधव विश्वांभर सोमवंशी (सिल्लोड),बाबा जानी(सिल्लोड) यांचा समावेश आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार,सहायक फोजदार शेख आसेफ,पोलीस कर्मचारी रामेश्वर सिनकर,जगदीश बावणे,गणेश पायघन,विजय जाधव,शेख वाजेद, सागर देवकर,लक्ष्मण वाघ,एकनाथ वाघ,अभिजित वायकोस,धर्मा शिंदे,भोपळे यांनी पार पाडली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें