सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२८ऑगस्ट २०१८
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दि. ३० सप्टेंबर २०१८ रविवार रोजी दुपारी १ वाजता सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कदम यांच्या सह अमृत शिंदे, बंडु सोळंके, अंनत कदम, माऊली जोगदंड, आण्णा जोगंदड आदी उपस्थित राहणार असून; या बैठकीत सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांचा विमा, कर्जमाफी, ऊस, कारखान्याचा प्रश्न व शरद जोशी शेतकरी संघर्ष यात्रेसह अन्य विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
या महत्वपूर्ण बैठकीस तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष विश्वंभर गोरवे, अंगद काळे, पांडुरंग गांगर्डे आदींनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें