अवैद्य रीत्या कमवलेल्या संपत्तीमुळे शिर्डी नगरपंचायतचा मुख्य लिपीक देसले पत्नीसह लाचलुचपतच्या जाळ्यात . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 1 अगस्त 2018

अवैद्य रीत्या कमवलेल्या संपत्तीमुळे शिर्डी नगरपंचायतचा मुख्य लिपीक देसले पत्नीसह लाचलुचपतच्या जाळ्यात .




शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी नगरपंचायतमध्ये मुख्य लिपीक म्हणुन काम करणारा मुरलीधर बाजीराव देसले व त्याची पत्नी रेखा मुरलीधर देसले नादुर्खी शिर्डी हिने त्यास उत्पन्नापेक्षा १७३०६१८ रुपये सुमारे ९२%त्यांच्या सेवा कालावधीत न्यात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्या मुळे  लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक किशोर हिरालाल चौधरी वय ४८पोलीस उपअधिक्षक अहमदनगर  यांनी शिर्डी पोलीसात गुन्हा दाखल करुन या दोघांना त्यांच्या पथकाने अटक केली आहे
या बाबद मिळालेली माहिती अशी कि शिर्डी नगरपंचायतीत काम करणारा मुरलीधर बाजीराव देसले याने डिसेंबर १९९४ते डिसेंबर २०१०च्या १६वर्षाच्या कालावधीत शिर्डी नगरपंचायत मध्ये काम करत असतांना त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती संपादन केली होती घटणेच्या प्रतिबंधीत कायदा सण १९८८भ्रष्टाचाराचे कलम १३ (१)(इ)सह१३(२) प्रमाणे प्रत्यक्षात दर्शनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले तसेच यातील आरोपी मुरलीधर देसले याला आरोपी नं २ रेखा मुरलीधर देसले हिने सहाय्य केल्याने त्या अनुसार भा.द.वि १०९प्रमाणे अपराध  केल्याचे निष्पन्न झाले लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक किशोर हिरालाल चौधरी यांच्या फिर्यादीवरुन शिर्डी पोलीसात गुन्हा रजि.न.७९/२०१८लाचप्रतिबंधक विभाग सण १९८८चे कलम १३ (१)(इ)सह१३ (२)भा.द.वि १०९प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन शिर्डीत या दोघांना ताब्यात घेतल्याचे समजताच मोठी खळबळ उडाली आहे शिर्डी नगरपंचायतमध्ये भेट दिली असता पुर्ण पणे शांतता पसरली होती दबक्या आवाजात ह्याच विषयावर कामगार चर्चा करत असल्याचे दिसुन आले गेल्या अनेक वर्षांपासून ते एकाच पदावर कामकरत असल्याने शिर्डी शहराचा त्यांना मोठा अभ्यास झाला होता त्या मुळे त्यांचा मोठा जनसंपर्क झालेला होता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या घटणेची गंभीर दखल घेतल्याचे दिसुन आले या   बाबद तपासी अधिकारी शाम पवरे यांच्याकडे चौकशी केली असता मुरलीधर देसले व पत्नी रेखा देसले या दोघांना अटक  केली असुन त्यांची चौकशी चालु असल्याचे सांगितले देसलेला पाठबळ देणारे व मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या काही सहकार्यानी चांगलाच धस्का घेतला असुन लाचलुचपतच्या चौकशीत बरीच धक्का दायक माहिती बाहेर येण्याची शक्यता असुन आता देसले तपासात काय माहिती देतो हे लवकरच समजनार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें