चारठाणा ( प्रभाकर कुर्हे ) सेलु तालुक्यातील चारठाणा निरवाडी रस्त्यावर दुचाकी बैलगाडी ला समोरुण धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाला असुन बैलगाडीतील शेतकरी गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना मंगळवार ३१ जुलै रात्री ८ वाजता घडली.
या बाबत आधिक माहिती अशी की सेलु तालुक्यातील निरवाडी येथील मुकेश खेमराव काळे हा तरूण दुचाकी क्रमांक एम.एच २२ एल ३१८५ ने निरवाडिहुन चारठाणा येथे येत होता. दरम्यान याच रस्त्याने शेतातील काम आटोपुन बैलगाडी सांवगी कडे जात होती.नाथा झोपडे यांच्या शेतातील मारोती देवस्थानासमोर मोटारसायकल स्वार वेगाने येत आसतांना बैलगाडीला समोरासमोर जोरदार धडक झाली मोटारसायकल ईतकी वेगात होती की बैलगाडीचे दोन्ही बैलांच्या खांद्यावरिल जु या अपघातात तुटले व मोटारसायकल बैलगाडिच्या साठ्याजवळ घुसलि या आपघातात दुचाकी वरील मुकेश काळे वय २१ वर्षे हा तरूण जागीच ठार झाला.तर बैलगाडी मधील शेतकरी बाबासाहेब ताठे वय ५० वर्षे हा गंभीर रित्या जखमी झाला असुन एका पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच आनेकजण घटनास्थळी मदतीसाठी धावले. घटनास्थळी चारठाणा पोलीसांनी देखील भेट देऊन माहिती घेतली.जखमी परभणी येथे रुग्नालयात उपचार चालु आहेत या आपघाताने निरवाडी गावावर शोककळा पसरलि आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें