फारुख अब्दुल्लांच्या घराजवळ बॅरिकेटस तोडून कारचा प्रवेश, सुरक्षारक्षकांच्या गोळीबारात चालक ठार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 4 अगस्त 2018

फारुख अब्दुल्लांच्या घराजवळ बॅरिकेटस तोडून कारचा प्रवेश, सुरक्षारक्षकांच्या गोळीबारात चालक ठार.



जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेतेफारुख अब्दुल्ला यांच्या घराच्या परिसरात घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीला शनिवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले. कारमधून आलेल्या या व्यक्तीने बॅरिकेटस् सोडून येथील व्हीव्हीआयपी परिसरात प्रवेश केला. मात्र, सतर्क असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी लगेचत्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये हा व्यक्ती मृत पावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, हा आत्मघाती हल्लाहोता का, याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें