सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष कार्यालय गांधी भवनात शक्ती प्रोजेक्ट उपस्थितांना मार्गदर्शन ;
सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.०५ ) -
वाडी - वस्ती - तांड्यांसह काँग्रेस पक्षाचा तळागळातील सामान्य कार्यकर्ता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्षांसोबत सरळ जोडण्यासाठी व काँग्रेस पक्षाच्या विचारांचा प्रचार - प्रसार व सुचनांसह काँग्रेस पक्षाचे नवनवीन ध्येय धोरण नविन संकल्पना तसेच शासकीय योजनांची सखोल माहिती सामान्यांपर्यंत पोहोचायला हवी यासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रोजेक्ट शक्ती सुरु करण्यात येत असुन प्रोजेक्ट शक्ती काँग्रेस पक्ष व कार्यकर्त्यांना बळ देणारे ठरणार असल्याचे मत माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. या वेळी शक्ती प्रोजेक्टच्या भिंतीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात प्रोजेक्ट शक्ती सोबत जुडण्यासंदर्भात काँग्रेस पक्ष पदाधिकारी - कार्यकर्ते नागरिकांची बैठक माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या प्रसंगी शक्ती प्रोजेक्टच्या भिंतीपत्रकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाल्यावर
आ.अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना प्रोजेक्ट शक्तीशी जुडण्यासंदर्भात मार्गदर्शन करीत असतांना पक्षाचे ध्येय - धोरणे समजावून सांगतांना नवतरूणांसह कार्यकर्त्यांनी प्रोजेक्ट शक्ती मध्ये स्वतःच्या मोबाईल वरून आपले मतदान ओळ्खपत्र क्रमांक ८८२८८४३०१० या क्रमांकावर संदेशद्वारे पाठवून यशस्वी नोंदणी करावी असे आवाहन केले .
यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास लोखंडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर,शांतीलाल अग्रवाल, प्रा.मन्सूर कादरी, रघुनाथ गोराडे, नरसिंगराव चव्हाण, दामुआण्णा गव्हाणे, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, रऊफ बागवान, सुनिल दुधे, रईस मुजावर पठाण, राजू गौर, अकिल वसईकर, मनोज झंवर, सत्तार हुसैन, लड्डू पटेल, शेख मोबिन, कैसर आझाद, बाबर बागवान, सतिश ताठे, कौतिकराव मोरे, निजाम पठाण, अली चाऊस, हरिदास दिवटे, रोहिदास पवार, संजय आरके, रफिक देशमुख, मोहमहद इसाक, रावसाहेब गव्हाणे, सत्तार बागवान, नामदेवराव पांढरे, संदीप राऊत, संजय मुरकुटे, दत्ताञय भवर, अमित आरके, रुपेश जैस्वाल, राजुमिया देशमुख, लक्ष्मण कल्याणकर, मनोज जैस्वाल, रामकृष्ण काकडे, अक्षय मगर, भगवान नाईक, कुणाल सहारे, अकिल देशमुख, रामभाऊ झोंड, संभाजी हावळे, मच्छिंद्र दांडगे, रविंद्र मगर, राहूल गव्हाणे, धनराज गोराडे, इम्रान कुरैशी, मनोज गोराडे, गणेश डकले, शांतीलाल बसय्ये, कृष्णा उखर्डे, अब्दुल वहाब, राजू सुरडकर, बाजीराव वाघ, एकनाथ शिंदे, कृष्णा कोठाळे, शेख जावेद, मनोहर आरके, जितू आरके, राजेश्वर आरके, जगन्नाथ कुदळ, फईम पठाण, अमोल कुदळ, रवि आरके, शेख वसिम, संतोष गायकवाड, सलिम कुरैशी, राम सरोदे, अफजल बेग, भावराव दुधे आदिंसह काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते - नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें