लोअर दुधना प्रकल्पातुन पाणी सोडण्याची मागणी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 5 अगस्त 2018

लोअर दुधना प्रकल्पातुन पाणी सोडण्याची मागणी .



कौसडी/प्रतिनिधी

जिंतुर तालुक्यातीलकौसडी व कुपटा,गव्हा,मारवाडी,सिमणगाव,झरी,माक,गोंधळा या परिसरात लोअर दुधना प्रकल्पातुन पाणी सोडण्याच्या मागणी चे निवेदन दिनांक 4 अगस्ट रोजी जिल्हा अधिकारी यांच्या कडे देण्यात आले आहे
मागील पंधरा ते विस दिवसा पासुन पावसाने उघडीप दिल्याने खरिप  पिके सुकु लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असुन शेतक-यांनी खाजगी सावराकडुन शासकीय बँकाकडुन कर्ज घेऊन बि-बियाने आणुन काळ्या आईची वटी भरले व दोन तीन पाऊस चांगले पडल्याने हे खरिप पिके टवटवीत दिसत होती मात्र मागील  पंधरा ते विस दिवसा पासुन पावसाने उघडीप दिल्याने टवटवीत दिसणारी खरिप पिके आत्ता माने टाकु लागली व सुकू लागली आहे
शेतक-याने महागमोलाचे बि-बियाणे रासयनिक खते कीटकनाशक औषधीय अंतर्गत मशागतीचे कामे व इतर बाबीवर निसर्गाची साथ मिळेल या दृष्टिकोणातुन शेतीत खर्च केला आहे व तोच केलेला खर्च उत्पनाच्या माध्यमातुन वसुल होईल कींवा नाही हे सगळे पाण्यावर अवलंबुन  आहे या करिता लोअर दुधना प्रकल्पातुन पाणी सोडण्यात आले तर सुकु लागलेल्या पिकांना जिवनदान मिळुशकते या करिता कौसडी येथील माजी सरपंच बाळासाहेब गंगाबापु देशमुख यांनी लोअर दुधना प्रकल्पातुन पाणी सोडण्याची मागणी जिल्हा अधिकारी यांच्या कडे केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें