सेलूचे नागरिक संतप्त ;आंदोलनाच्या पावित्र्यात.
सेलू! प्रतिनिधी
तहसीलदार छडीदार यांनी सेलूतील त्यांच्या कार्यकाळात
अनेक शासकीय प्रकरणात अनियमितता केलेली असून त्या प्रकरणांची चौकशी चालू असताना देखील 14 महिन्यापूर्वीच येथून बदलून गेलेले वादग्रस्त तहसीलदार आसाराम छडीदार यांची पुन्हा केवळ तीन महिन्या करिता सेलू तहसीलदार पदी नियुक्ती झाली असून ते लवकरच पदभार घेणार असल्याचे वृत्त कळताच नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलन करण्यात येणार आहे. दीड वर्षापूर्वीच सेलू चे तत्कालीन तहसीलदार आसाराम छडीदार यांची गंगाखेड येथे बदली झाली होती. तेथेही ते वादग्रस्त ठरले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तसेच सेलू येथे निवडणूक निधी मध्ये भ्रष्टाचार करून कर्मचारी असलेल्या इसमास कंत्राटी दाखवून जवळपास लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला होता. शिवाय अकृषिक केलेल्या मोकळ्या जागेवर नगर रचना कार्यालयाने दिलेल्या नकाशावर खाडाखोड करून चोवीस वाढीव भूखंडास परवानगी देऊन शासकीय कागदपत्रात खाडाखोड केली होती. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश चौकशी अधिकारी सहाय्यक जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. मात्र तरीही सदरील प्रकरणात अद्याप पर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई झालेली नाही.असे असताना पुन्हा सेलू तहसीलदारपदी आसाराम छडीदार यांची बदली करण्यात आलेली आहे. यापूर्वी सेलू तहसील मध्ये आसाराम छडीदार यांनी मोठ्या प्रमाणात अनियमितता केलेली असून त्यांची कारकीर्दच वादग्रस्त ठरलेली आहे.
मात्र तरीही सेलूला येण्याचा त्यांचा अट्टहास कोणी पुर्ण केला याचीही चर्चा होतआहे.
याबाबत सेलू परिसरात आणि महसूल प्रशासनात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या हातून मागील काळात केलेल्या चुका पुन्हा दुरुस्त करण्याकरिता. कागदपत्रांमध्ये खाडाखोड करण्या करता तर येत नाहीत ना अशी चर्चा जनसामान्य मध्ये होत आहे. त्यांच्याच कार्यकाळात वाळूमाफिया रॉकेल माफिया, स्वस्त धान्य दुकानावरील भ्रष्टाचार, याबाबत फार मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या याच कार्यकाळात आसाराम छडीदार यांच्याकडे सेलू नगरपरिषदेचा मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यभारही त्यांच्याकडे होता. त्यातही त्यांनी अनागोंदी केलेली आहे.
तसेच गंगाखेड येथे रुजू झाल्यानंतर ही त्यांनी वाळू माफिया शी सलगी केलेली होती. तीच त्यांना भोवली. असून जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी छडीदार यांना दीर्घकाळ सक्तीच्या रजेवर पाठवले होते. आता पुन्हा निवृत्ती करीता केवळ तीन महिने उरले असून पुन्हा सेलू चा तहसीलदारपदी आसाराम छडीदार यांचे आदेश आलेले असून लवकरच ते पदभार घेणार आहेत. मात्र त्यांच्या जागी रुजू झालेले तहसीलदार स्वरूप कंकाळ यांची गंगाखेड येथे बदली झाली असून ते बदलीच्या ठिकाणी रुजू होणार की मॅटमध्ये जाणार याबाबतही महसूल कर्मचार्यात चर्चा होत आहे. काम करणा-या चांगल्या अधिका-यावर मात्र अन्याय झाल्याची भावना सेलूकर व्यक्त करत आहेत.
सेलूचे संतप्त नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात सेलूचे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी प्रशासकीय कारभार व्यवस्थित सांभाळला असताना, शिवाय त्यांचा येथील २ वर्षाचा कालावधी शिल्लक असताना त्यांची बदली गंगाखेड येथे करण्यात आली. आणि त्यांच्या जागी अनेक चौकशीत अडकलेल्या तहसीलदार आसाराम छडीदार यांची बदली करण्यात आल्याने सेलू तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून छडीदार यांनी सेलू तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारल्यास नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें