शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : शहरातील रफिक कॉलनी येथील खतिजा ऊर्दू शाळा समोरील रास्ता व नाल्याचे सिमेंटी करण करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन शाळेतील शिक्षक व परिसरातील नागरिकांच्या वतीने नगराध्यक्षांचे पती राजाभाऊ देशमुख यांना देण्यात आले नागरिकांचे म्हणणे आहे की या ठिकाणाहून विध्यार्थ्यांना पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व रस्त्यावर पाणी तुंबून त्यात मच्छरांचा डास मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे, याच रस्त्यावर मस्जिद आहे परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात नमाजसाठी जातांना मोठी कसरत करावी लागते.दोन वर्षांपूर्वी मोजणी होऊन सुद्धा नगरपालिकेचे याकडे लक्ष नाही,असे नागरिकांचे म्हणणे आहे.निवेदनावर नगरसेविका संध्याताई शर्मा,दिपक बोर्डे,राहुल ठाकूर,मुख्याध्यापक अकील शाह, हरून सर ,सादिक कुरेशी,सलीम शाह,अफसर चौधरी, अस्लम शाह,शेख खाजा, शेख रहीम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें