सेलू : येथील नूतन विद्यालयाच्या संगीत विभागाच्यावतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून कै.रा.ब.गिल्डा सभागृहात गुरूवार (दि.२ ) रोजी संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संतवाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. अनुष्का हिवाळे हिने गायलेल्या 'माझे माहेर पंढरी' या अभंगाने वातावरण भक्तीमय झाले.तर वरद दलालने गायलेल्या 'अमृताहून गोड नाम तुझे देवा' या अभंगाने रसिक श्रोते भारावून गेली.गीत मंचाच्या विद्यार्थी गायकांनी संतवाणीने सभागृहातील रसिक श्रोत्यांना भक्तीरसाने तृप्त केले. वैष्णवी खरावणे,सायली पांडव,गायञी कुलकर्णी,प्रांजल सावरगावकर,वैष्णवी गोरे,गौरी तेरकर,अभिजीत गजमल,ओवी दडके,निलेश दिशागत,चिन्मय कुलकर्णी,कृष्णा होलीया,व्यंकटेश वेदपाठक,श्रीहरी गांजापूरकर,सुदर्शन मोगल,अभिजीत कुलकर्णी,किर्ती घांडगे,शंतनू पांडे,अभिजीत गायकवाड,व्यंकटेश माळवे हे विद्यार्थी संतवाणी कार्यक्रमात सहभागी झाले होते. या प्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डि.के.देशपांडे,सहसचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर,सदस्य विनायकराव पावडे,शालेय समितीचे अध्यक्ष सितारामजी मंञी, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी,मुख्याध्यापक के.व्ही.वाघमारे,पर्यवेक्षक अशोक गाजरे,मा.मा.सुर्वे,पालक,ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांनी केले.तर सुञसंचालन अतुल पाटील,अभिजीत पावडे यांनी केले.
सेलू : येथील नूतन विद्यालयाच्या संगीत विभागाच्या वतीने आयोजित संतवाणी या कार्यक्रमात अभंग गातांना अनुष्का हिवाळे आणि सहभागी विद्यार्थी.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें