डुकरांचा उपद्रव वाढला तिडका येथे होणार डुकरांचा लिलाव.
सोयगाव प्रतिनिधी:२४
सोयगाव तालुक्यातील तिडका गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा तर उपद्रव वाढलच आहेच पण मोकाट डुकरांचाही मुक्त संचार वाढला आहे, गल्लीबोळात मोकाट डुकरे हुंदळतांना दृष्टिक्षेपास पडतात.व डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी एका जाहीर प्रगटना द्वारे तहसीलदार यांना करन्यात आले होते अशी माहिती AIMIM तालुका अध्यक्ष अखिर दादा यानी दिली.या मागणीसाठी अखिर दादा यांनी पाठ पुरावा केल्याने ग्रामपंचायत कार्यालय तिडका यांना लिलाव करण्यास भाग पाडले.गेल्या काही वर्षांपूर्वी कोणीही तरी गावात डुकरे अणुन सोडले त्याची दुप्पट वाढ झाल्याने नागरिकांचा त्रास वेढलेला आहे.व गावाशेजारील शेतात घुसून पिकांची नासधूस करतात. विशेष म्हणजे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांना चावा घेण्याच्या प्रकार पण वाढलेला आहे, हे प्रकार लक्षात घेता ग्रामपंचायतीने हे निर्णय घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें