नूतन विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 30 अगस्त 2018

नूतन विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात साजरा.


सेलू (समशेर खान)  येथे नूतन विद्यालयात मेजर ध्यान चंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. अनिकेत जोगदंड म्हणाले खेळाडू मैदानावर सातत्याने खेळत रहील्याने शारीरिक, बौद्धिक, सामाजिक विकास  होऊन जीवनात यशस्वी होतो.
कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी उप.मु.अ. अनिल कुलकर्णी, प्रमुख पाहुणे डॉ. अनिकेत जोगदंड, प्रा.नागेश कान्हेकर, अशोक गाजरे, मा.मा.सुर्वे, के.पी.राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर अनंतकुमार विश्वभंर यांनी प्रकाश टाकला. या प्रसंगी  सचिदानंद डाखोरे यांनी गायलेले " खेळ खेळुया देशाची शान वाढुया " या वर 100 खेळाडू नी क्रीडा प्रात्यक्षिके सादरीकरण केले.
राष्ट्रीय ,राज्य व जिल्हा विजयी खेळाडू चा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमचे सुत्रसंचालन गणेश माळवे, आभार प्रदर्शन   सतिश नावाडे, यांनी मानले.
यशस्वीते साठी प्रंशात नाईक,   के.के. देशपांडे, सौ.एन.डी. पाटील, परीश्रम घेतले.
नूतन विद्यालय सेलू येथे राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला याप्रसंगी खेळाडू समावेश डॉ. अनिकेत जोगदंड, अनिल कुलकर्णी, अशोक गाजरे, मा.मा.सुर्वे, सतिश नावाडे, प्रा.नागेश कान्हेकर, गणेश माळवे, प्रंशात नाईक, के.पी.राठोड,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें