दर्जेदार साहित्य व्यक्तीला आनंदी व उत्साही जीवन जगण्याची प्रेरणा देते-प्राचार्य सातपूते. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 7 अगस्त 2018

दर्जेदार साहित्य व्यक्तीला आनंदी व उत्साही जीवन जगण्याची प्रेरणा देते-प्राचार्य सातपूते.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि. ०७अॉगस्ट २०१८
येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात रविंद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रविंद्रनाथ टागोर यांच्यावर 'गितांजली' भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते हे होते. तर  प्रा.शुभम गलांडे, प्रा.डॉ.शिवाजी वडचकर, प्रा.सखाराम कदम, प्रा.विठ्ठल जायभाये, प्रा.दिलीप कोरडे, प्रा.पंडीत राठोड आदींची प्रमुख उपस्थित होती.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.विठ्ठल जायभाये यांनी केले. यावेळी प्रा.गलांडे यांनी टागोरांच्या गीतांजली व ईतर साहित्यावर प्रकाश टाकला. प्रा.कदम यांनी टागोरांची वैश्वीकता, प्रा.वडचकर यांनी टागोर आणि निसर्ग ईत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य सातपुते यांनी 'एका वर्षात हजारो कविता लिहल्या जातात परंतु एखादी कविता हजारो वर्षे चिरंतन आसते', असे सांगून वाङमय हे प्रत्येक व्यक्तीला आनंदी व उत्साही जीवन जगण्याची सदैव प्रेरणा देत असते असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए.तृतीय वर्षाचा विद्यार्थी आसेफ आत्तार याने केले तर कु.कन्याकुमारी भोसले या विद्यार्थीनीने आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुण धर्मे, कु.रेवती लोंढे, कु.नुर, कु.ऊबाळे, कु.खरात, कु.यादव, सुदर्शन बदाले, सचिन, सोनवने व संतूक परळकर आदिंनी परिश्रम घेतले. शेवटी टागोरांच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें