सोनपेठ तालुका ग्रंथ वाचन चळवळीच्या प्रेरणेतून शाळेचे ग्रंथालय समृध्द होत आहे- शेख. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 1 अगस्त 2018

सोनपेठ तालुका ग्रंथ वाचन चळवळीच्या प्रेरणेतून शाळेचे ग्रंथालय समृध्द होत आहे- शेख.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि. ०१अॉगस्ट २०१८
तालुक्यातील मौ.विटा (खु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी कु. सानिया हुसेन सय्यद हिचा वाढदिवस शाळेत साजरा करण्यात अाला.
या प्रसंगी तिने शालेय ग्रंथालयास पुस्तके भेट दिली.
सोनपेठ तालुका ग्रंथ वाचन चळवळीच्या प्रेरणेतून शाळेत ग्रंथरूपी वाढदिवस साजरे होत आहेत. यामुळे ग्रंथालय अधिक समृद्ध होत आहे असे मत मुख्याध्यापक शेख यांनी यावेळी व्यक्त करून, यामुळे विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण होऊन त्याचा उपयोग भाषण, निबंध, कलेसाठी पुस्तके उपयुक्त ठरत आहेत असेही यावेळी  बोलतांना त्यांनी सांगितले.
शाळेच्या वतीने विद्यार्थी प्रतिनिधी इम्रान  पठाण व विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. सानिया  शेख तसेच सहशिक सर्वश्री होसनाळे, बनाळे, शेख व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरूण तुपसमिंद्रे व सदस्य विटा (खु.) यांनीही तिला शुभेच्छा दिल्या तर वाढदिवसा निमित्त शाळेस पुस्तके भेट दिल्याबद्दल सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्या वतीने अध्यक्ष राजेश खेडकर यांनीही कु.सानिया हुसेन सय्यद हिचे अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें