शुद्ध पाणी उपलब्ध करुन देणे आपले उत्तरदायित्व - आ. अब्दुल सत्तार ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 22 अगस्त 2018

शुद्ध पाणी उपलब्ध करुन देणे आपले उत्तरदायित्व - आ. अब्दुल सत्तार ;


गुरुकृपा इंडस्ट्रीज पाणी प्रकल्पाचे आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न;



सिल्लोड (प्रतिनिधी )दि 22
नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी अत्यल्प दरात शुद्ध पाणी उपलब्ध करुन देणे आपले उत्तरदायित्व आहे त्यासाठी सकारात्मक पाऊल टाकणा-या गुरुकृपा इंडस्ट्रीचे कौतुक केले पाहिजे, त्यांनी याकामी सातत्य ठेऊन काम करण्याची गरज असल्याचे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
गुरुकृपा इंडस्ट्रीजच्या वतीने सिल्लोड शहरातील तहसिल कार्यालयासमोर व उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांसाठी एक रुपया लिटर दराने शुद्ध पिण्याचे पाणी असलेला प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पाचे उदघाटन आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,नगराध्यक्ष अब्दुल समीर,देविदास लोखंडे,श्रीराम पाटील महाजन, नामदेवराव चापे,नंदकिशोर सहारे, दामोधर गव्हाणे,नरसिंगराव चव्हाण,कौतिकराव मोरे,सत्तार हुसैन,राजरत्न निकम,मधुकरराव बेंडाळे,राजेंद्र बन्सोड,संजय मुरकुटे,अमित आरके,मनोहर आरके,सखाराम अहिरे, राजेश्वर आरके,रवि आरके, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप वाघ यांनी केले. सुञसंचालन कुळकर्णी यांनी तर दादाराव शेळके यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवराज यादव,प्रियंका वाघ,धनंजय देशमुख,पंढरीनाथ काकडे,नंदु वानखेडे,दादाराव शेळके,एम.के.क्षेञिय,अमोल बोर्डे,रोहीत जमधडे,नारायण गोराडे,आदींनी अथक परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें