खेळणा मध्यम प्रकल्पास आ.अब्दुल सत्तार यांची भेट; सिल्लोड शहरास एक महिना पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक - आ. अब्दुल सत्तार; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 3 अगस्त 2018

खेळणा मध्यम प्रकल्पास आ.अब्दुल सत्तार यांची भेट; सिल्लोड शहरास एक महिना पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक - आ. अब्दुल सत्तार;




सिल्लाेड - (प्रतिनिधि) दि.03

सिल्लाेड शहराला पाणीपुरठा करणा-या खेळणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपल्याने शहरातील एक लाख जनतेची तहान भागविन्यासाठी एक महिनाच पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्याचे माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी सांगितले. नगरपरिषदेकडून मोठ - मोठे तीन चर खोदण्यात आलेले असुन विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
सिल्लाेड शहराला खेळना मध्यम प्रकल्पातुन पाणीपुरठा याेजना कार्यान्वित आहे.यंदा मात्र खेळना धरनक्षेत्रात काहीच पाउस न पडल्याने धरनात गतवर्षीचाच मृत साठा हाेता.याच पाणीसाठ्यावर सिल्लाेड नगरपालीकेतर्फे पाण्याचे नियाेजन करुन आजपर्यंत शहरवाशीयांची तहान भागविण्यात येत आहे.
आॅगस्ट महिना लागला तरी अद्यापही रिमझिम पावसाच्या भरवशावरच पिके तग धरुन आहेत.धरणक्षेञात अद्यापही एकही मोठा पाऊस न पडल्याने धरणात पाणीच न आल्याने पाणीटंचाईसंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी शुक्रवार (दि 03)रोजी सिल्लोड शहरास पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या खेळणा मध्यम प्रकल्पास भेट देऊन पाणी साठ्यासंदर्भात माहिती घेऊन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक कायंदे यांच्याशी विविध उपाययोजनांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल,माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ,रईस मुजावर पठाण, संजय मुरकुटे,मधुकर बेंडाळे,मोईन पठाण, मच्छिंद्र दांडगे (सरपंच - सारोळा), अमोल कुदळ, मोहन गायकवाड, जगण आरके,शमीम भाई , यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें