सेलू नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांना निलंबित करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 8 अगस्त 2018

सेलू नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांना निलंबित करण्याची मागणी.



सेलू प्रतिनिधी समशेर खान

सेलू नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास जाधव हे रुजू झाल्यापासून अत्यंत महत्त्वाची व निकडीची कामे विहित मुदतीत करत नाहीत मंत्रालय व जिल्हाधिकारी स्तरावरील चौकशांना वेळेत न्याय देत नाहीत तसेच पालिकेची मालमत्ता सांभाळण्यात अयशस्वी ठरत असल्यामुळे सेलूचे तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांच्यावर शिस्तभंग करण्या विषयक अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेला आहे मात्र तरीही मुख्याधिकारी यांच्या कामात कुठल्याच प्रकारचा बदल होताना दिसत नसल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी  दिलीप डासाळकर यांच्या वतीने करण्यात आली आहे
 सेलू चे मुख्याधिकारी देविदास जाधव ते सेलू येथे रुजू झाल्यापासून  सेलू तील नागरिकांची कामे तात्काळ होतील अशी अपेक्षा सेलू तील नागरिकांना होती मात्र सेलू तिले नागरिकांची ही अपेक्षा फोल ठरली असून मुख्याधिकारी देविदास जाधव हे केवळ नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचीच कामे करण्यात व्यग्र असतात तसेच जी काही विकास कामे चालू आहे त्यांच्या कंत्राटदाराची बिले लवकरात लवकर कशी काढता येतील याकडे जास्त लक्ष देतात ज्या कामांकडे  प्रामुख्याने लक्ष द्यावयास पाहिजे त्या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील नागरिकांच्या  तक्रारीत वाढ झाली आहे वाढलेल्या तक्रारीकडे सुद्धा दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे  जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या चौकशा अपूर्ण अवस्थेत आहेत त्यामुळे कार्यालयात कमी आणि इतरत्रच जास्त लक्ष दिल्यामुळे  नगर परिषदेतील कर्मचाऱ्यावर देखील त्यांचा वचक राहिलेला नाही अशा अनेक जनसामान्य लोकांच्या  मागणीमुळे सेलू नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांना तात्काळ निलंबित करावे व कार्यक्षम मुख्याधिकारी नेमण्यात यावा अशी मागणी जनसामान्य तूंन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें