प्रतिनिधी.वालुर.
सेलु तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वालुर या गावाती वार्ड क्र.5 मधील रोशनपुरा मोहल्यात मागील चार वर्षापासुन मुख्या पाणी पुरवठा पाईपलाईन खराब झाल्याने या भागात नळाला पाणी येत नसल्याने या भागातील लोकांना पाण्यासाठि भटकंती करावी लागत होती.
या प्रकरणी या भागातील नागरीकांनी ग्रामपंचायत वालुरला व पंचायत समिती सेलुला यांची वारंवार तक्रार करुन देखील या प्रकरणी ग्रामपंचायत दुर्लक्ष केलेले होते.याच प्रकरणाची येथील महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठाण संघटनेच्या वतिने दि.06/01/2018.रोजी एका निवेद्नाद्वारे वालुर ग्रामपंचायतला 25 जाने.2018. रोजी कुलुप ठोकण्याचा ईशारा दिल्यावर ग्रामपंचायत वालुरने या भागातील पाईपलाईन केली पंरतु ती अर्धवट कर्ण्यात आली व या भागाती बहुतेक नागरीकांना आजच्या घडिला सुध्दा पाण्यासाठि भटकंती करावी लागत आहे.या संबधिचे निवेदन या अाधि दि.30/01/2018.गटविकास अाधिकारी पं.स.सेलु यांना व दि.06/06/2018.रोजी मुख्यकार्यकारी आधिकारी जि.प.परभणी व याच प्रमाणे या प्रकरणाची आपले सरकार पोर्टलवर वारंवार तक्रार करुन देखिल प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याने दि.30/07/2018.रोजी महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठानच्या वतिने ग्रामपंचायत वालुरला ताळा ठोकण्याचा ईशारा दिला.
या प्रकरणी ग्रामपंचायत वालुरने येत्या 14 ऑगस्टच्या आत जर आर्धवट केलेली पाणी पुरवठा पाईपलाईन पुर्ण न केल्यास ग्रा.वालुरला येत्या 14 ऑगस्ट 2018.रोजी ताळा ठोकण्यात येईल व संबधित सर्व गैर सोईना प्रशासन जबाबदार राहिल असे निवेदनात नमुद केले आहे.संबधित निवेदन मा.गटविकास आधिकारी पंचायात समिती,सेलु यांना दि.30/07/2018. रोजी महाराष्ट्र मुस्लीम युवक प्रतिष्ठानच्या सेलु तालुकाध्याक्ष अनवर खान दिलावर खान पठान यांनी दिले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें