केरळ येथील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन ; सिल्लोडला आ.अब्दुल सत्तार यांनी काढली मदत फेरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 24 अगस्त 2018

केरळ येथील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन ; सिल्लोडला आ.अब्दुल सत्तार यांनी काढली मदत फेरी.



सिल्लोड : प्रतिनिधी (दि.२३) -
देशातील निसर्गरम्य सृष्टीने नटलेल्या केरळ राज्यात सर्वत्र निसर्ग कोपला असून झालेल्या अतिवृष्टीमुळे भयानक महापुराचा सामना तेथील जनतेला करावा लागत आहे.या महापुरात केरळ राज्यातील शेकडों नागरिकांना जीव गमवावा लागला तर लाखो कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आलेली असून आपल्या देशबांधवांना सढळ हाताने आर्थिक मदत करण्याचे आवाहन आ.अब्दुल सत्तार यांनी केले आहे .

केरळ राज्यात पावसाच्या रौद्ररुपामुळे ओढवलेल्या भीषण आपत्तीत मानवी जीवनाबरोबरच हजारो कोटी रुपयांची मालमत्ता वाहून गेली आहे. पुरामध्ये घर, दार वाहून गेल्यामुळे लाखो लोकांचे संसार उघडयावर आले आहेत. त्यामुळे केरळ राज्यातील नुकसानग्रस्त जनतेला मदतीचा हात देण्यासाठी माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात गुरुवार ( दि.२३ ) रोजी सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मदत मंडतफेरी काढण्यात आली असून नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आ.अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे, तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, प्रा.मन्सूर कादरी, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, अशोक सूर्यवंशी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गुरुवार ( दि.२३) रोजी सिल्लोड शहरातील व्यापारी - प्रतिष्ठित यांची भेट घेऊन अतिवृष्टीमुळे भयानक पुराचा सामना करीत असलेल्या केरळ येथील जनतेला आर्थिक मदत करण्यात यावे असे आवाहन केले असता शहरातील अनेक व्यापारी - प्रतिष्ठित नागरिकांकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे.
आ.अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड शहरातील व्यापारी - प्रतिष्ठित नागरिकांनी केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतनिधीसंदर्भात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आर्थिक देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, राजकुमार कटारिया,  सतिश ताठे, शेख मोहसीन, सलिम हुसैन, अमित आरके, मनोज झवर, निजाम पठाण, संजय आरके, शेख बाबर, राजेंद्र बन्सोड, लक्ष्मणराव तायडे, मोहम्मद इसहाक, संजय मुरकुटे, दत्तात्रय शेजूळ, शेख मो.हनिफ, अकिल देशमुख, मधुकर बेंडाळे, भिकचंद कर्णावट, राजु साठे, कुणाल सहारे, मुश्ताक देशमुख, मनोहर आरके, शेख बाबर, राजेश्वर आरके, शेख मिया, राजुमिया देशमुख, सखाराम अहिरे, शिवदास दणके, धनराज गोराडे, बेबीताई पुसे, झाकीर देशमुख यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें