सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२३ऑगस्ट २०१८
केरळ मधील पूरग्रस्तांसाठी सोनपेठ शहरातून रोटरी क्लब व पत्रकार बांधवांनी एकत्रितपणे फेरी काढून तब्बल १६९०५ रुपयांचा मदत निधी जमा केला.
गेल्या कांंही दिवसांपासून केरळ राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे असंख्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सद्य परिस्थितीतही तेथील नागरिकांची अत्यंत बिकट आवस्था निर्माण झालेली आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरातील मदतीचे लाखो हात सरसावले आहेत. सोनपेठ येथुन रोटरी क्लब आणि पत्रकार बांधवांच्या वतीनेही शहरातून दि.२३ ऑगस्ट रोजी मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या मदत फेरीत शहरातील असंख्य व्यापाऱ्यांनी सढळ हाताने मदत केली. यामधून तब्बल ११९०५ रुपयांची व रोटरी क्लब सदस्यांनी ५००० असे एकंदरीत १६९०५रूपये मदत जमा झाली. जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये थेट पाठवण्यात आली.
पुरग्रस्तांसाठी मदत मागण्या साठी काढलेल्या या मदत फेरीत रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, सचिव चंद्रकांत लोमटे, रो.संजय आढे, रो.संजय राख, रो.लिंबाजी कागदे, रो.संतोष निर्मळे, रो.प्रा.डॉ. वसंत सातपुते, रो.संजय इंदूरकर, गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण, मीरा दीदी, मुख्याध्यापक किशनराव रत्नपारखे, पत्रकार कृष्णा पिंगळे, शिवमल्हार वाघे, बाबासाहेब गर्जे, सहशिक्षक रामेश्वर राऊत, विलास मुंडे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सहभाग होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें