WhatsApp वर आणखी एक नवे फिचर! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 31 जुलाई 2018

WhatsApp वर आणखी एक नवे फिचर!



जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि आघाडीचे मेसेजिंग अॅप WhatsAppवर आणखी एका भन्नाट फिचरचा समावेश झाला आहे. या नव्या फिचरमुळे आता व्हिडिओ कॉलिंगची मजा केवळ दोघात नव्हे तर ग्रुपमध्ये देखील घेता येणार आहे. फेसबुकच्या F8 डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये या वर्षाच्या शेवटी WhatsAppवर व्हॉईस आणि व्हिडिओ ग्रुप कॉलिंगची सेवा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवार पासून WhatsAppचे हे नवे फिचर सर्वांसाठी खुले झाले आहे. हे फिचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही युझर्ससाठी देण्या आले आहे.  WhatsAppच्या या ग्रुप कॉलिंग फिचरमध्ये एकाच वेळी चार लोकांना बोलता किंवा व्हिडिओ कॉल करता येणे शक्य होणार आहे. WhatsAppने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांपासून युझर्स व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल सेवा वापरत आहेत. आता त्यात आणखी एक नवे फिचर अॅड केले जात असून यापुढे मित्रांसह ग्रुप कॉल करता येणार आहे. WhatsApp युझरला सुरुवातीला एका व्यक्तीला कॉल करावा लागेल. त्यानंतर त्या कॉलमध्ये अन्य दोघांचा समावेश करता येऊ शकले. जर तुमच्या WhatsApp वर हे फिचर आले नसले तर गुगल प्ले स्टोअरमधून WhatsApp अपडेट करून घ्यावे लागेल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें