पॉलीटेक्नीक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची अट रद्द. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 6 जुलाई 2018

पॉलीटेक्नीक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची अट रद्द.



प्रतिनिधी.समशेर खान.
सेलू-पॉलीटेक्नीक अभ्याक्रमास प्रवेश घेण्यासाठी मागास विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केले होते त्यामुळे १० वी उत्तीर्ण झालेल्या शेकडो मागास वर्गीय विद्यार्थ्यांची अडचण झाली होती.याला विरोध होऊ लागल्याने राज्य शासनाने अखेर त्यांची दाखल घेऊन प्रवेशाच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.तरी विदयार्थी व पालकांनी आता जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी पॉलीटेक्नीक प्रथम वर्ष प्रवेशाकरिता दि.१६/७/२०१८ तर पॉलीटेक्नीक थेट द्वितीय वर्ष प्रवेशाकरिता दि १२/७/२०१८ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असे आव्हान श्रीराम प्रतिष्ठान संचालित अपूर्वा पॉलीटेक्नीक चे प्राचार्य प्रा.अशोक बोडखे यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें