श्रमाने च यश मिळवता येते---श्री उमाकांत पारधी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 6 जुलाई 2018

श्रमाने च यश मिळवता येते---श्री उमाकांत पारधी.

प्रतिनिधी.समशेर खान.
सेलू- जीवनात यश मिळवण्यासाठी केवेळ  प्रयत्न व श्रम हेच महत्वाच आहे. कठीण परिस्तीत वर मातकरता येते ते जिद्दी नेच.आपले कर्म यश संपादन करून देते. उत्तम अभ्यास,व्यायाम आणि निश्चित ध्येय आपली स्वप्न पूर्ती करीत असतात.असे उदगार सेलू चे उपविभागीय अधिकारी श्री उमाकांत पारधी यांनी काढले.ते नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनी आयोजित गुणवंत विध्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.
     3 जुलै हा नूतन विधालय शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन आहे.दर वर्षी याचे आवचित्य साधून संस्थेतील गुणवंत विध्यार्थी चा सत्कार समारंभ आयोजित केला जातो.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा डॉ ज्ञानोबा निर्मळ होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री डी. के.देशपांडे सर यांनी केले तर अहवाल वाचन प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी यांनी केले.पाहुण्यांचा परिचय बी के गांजापूरकर यांनी दिला. कार्यक्रमाचे संचलन प्रा संजय पिंपळगावकर यांनी केले.व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ एस.एम.लोया,सचिव डी. के.देशपांडे,सहसचिव प्रा.डॉ.कोठेकर विनायकराव,जयप्रकाश जी बिहाणी,प्राचार्य डी आर कुलकर्णी  हे उपस्तीत होते
    गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारा नंतर श्री ज्ञानोबा निर्मळ यांनी आपले विचार मांडले.ते म्हणाले चांगले संस्कार च माणसाला आयुष्यात यशस्वी बनवतात.आपली निष्ठा ,आपली मेहनत हीच आपली पुंजी आहे.आपल्या शालेय जिवनातील आठवणी सांगताना आपल्या गुरुजीं नी आपणास कसे घडवले या आठवणी ते सांगत होते. स्वागत गीत व अभंग सचितानंद डाखोरे यांनी सादर केले तर आभार प्रदर्शन श्री अशोक लिंबेकर यांनी केले.
हा समारंभ यशस्वी ते साठी श्री अनिल कुलकर्णी,गिरीश लोढया,नंदकिशोर बंगाळे,अनिल रत्नपारखी,नागेश कान्हेकर, के के कदम,श्याम सोळंके,देऊळगावकर आदिनी सहकार्य केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें