हात मदतीचा सामाजिक चळवळ* *व्हावी -डाॅ काशीकर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 11 जुलाई 2018

हात मदतीचा सामाजिक चळवळ* *व्हावी -डाॅ काशीकर.



सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांच्या हात मदतीचा या उपक्रमास वाढता प्रतिसाद.

सेलू प्रतिनिधी शमशेर खान
दि ११ जुलै २०१८ बुधवार  रोजी शहरातील  जिजामाता बालविद्या मंदिर  शाळेत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना *हात मदतीचा* एक सामाजिक उपक्रमा अंतर्गत   गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले,अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला शाखा हेलस  चे संस्थापक                              कै, दत्तात्रय हेलसकर यांच्या कार्य प्रेरणेतून शहरातील  सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड म्हणजेच आपला माणूस यांनी सामाजिक जाणिवेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली,    या कार्यक्रमासाठी  अध्यक्ष म्हणून डॉ, अनिकेत जोगदंड हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून सेलू पोलीस स्टेशनचे  सहायक पोलिस निरीक्षक  श्री डॉ, नितीन काशीकर, प्रा,के, डी, वाघमारे, श्री डी, व्ही.मुळे, श्री गुलाबराव गायकवाड, हे उपस्थित होते, तसेच या प्रसंगी सतीश जाधव, सुनील गायकवाड, रमेश दौड, शेख साजिद, प्रशांत ठाकूर, अशोक रसाळ, प्रताप काकडे, योगेश ढवारे,  विलास कांबळे, यांची उपस्थिती होती,  कार्यक्रमाची सुरुवात शालेय परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली.  व्यासपीठावरील मान्यवरांनी डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र पाठक यांनी केले, सुनील गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना या उपक्रमा विषयी माहिती दिली, प्रा, के,डी.वाघमारे यानी विद्यार्थ्यांना संघर्षातून कसे उभे रहावे हे सांगून दरवर्षी या शाळेतील विद्यार्थ्यांना १० गणवेश देण्याचे आश्वासित केले.  डी.व्ही.मुळे यांनी शाळेच्या वाटचाली विषयी माहिती दिली. रमेश दौड यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा दिला,  या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री योगेश ढवारे यानी कै .दत्तात्रय हेलसकर यांच्या कार्याची माहिती सांगून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.                   अध्यक्षीय समारोप करताना डॉ. अनिकेत जोगदंड यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.                या वेळी शाळेतील ३० विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश शेळके यांनी तर आभार भगवान पावडे यांनी मानले.   कार्यक्रम यशस्वीतेसाठी काळे विजयमाला, कृष्णकांत खापरखुंटीकर, राठोड सुनील, धनवे बाळू, तुकाराम अंभुरे यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें