_सोशल मीडियातील महत्त्वाचा घटक असलेले मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या फिचरमुळे व्हाट्सअॅपवर येणारा मेसेज कुणी तयार केला आहे याचा पत्ता लागणार आहे. याचाच अर्थ तुम्ही फॉरवर्ड करत असलेला मेसेज हा तुमचा स्वत:चा आहे की, तो दुसऱ्याच कोणी तयार केला आहे, हे या फिचरमुळे कळण्यास मदत होणार आहे.'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर', असे या फिचरचे नाव आहे..._
▫दरम्यान, हे नवे फिचर्स तुमच्या व्हाट्सअॅपमध्ये सुरू होण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपचे अपडेट असलेले व्हर्जन वापरावे लागेल.
▫व्हाट्सअॅपने चांगले पाऊल टाकत हे फिचर तर तयार केले.
▫पण, फेक न्यूज आणि फेक संदेशांना आळा घालण्यासाठी हे फिचर्स किती कामी येईल हे लवकरच समजणार आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें