पाणीपुरीसाठी सडलेल्या वस्तूंचा वापर, पावसाळा संपेपर्यंत बंदी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 27 जुलाई 2018

पाणीपुरीसाठी सडलेल्या वस्तूंचा वापर, पावसाळा संपेपर्यंत बंदी.


लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सोडणारा पदार्थ म्हणजे पाणीपुरी. देशभरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने पाणीपुरी बनवली जाते. परंतु सध्या गुजरात मधील वडोदरा शहरातील लोकं पाणीपुरीचे नाव काढताच तोंड वेडावत आहेत. याला कारणही तसेच आहे.‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, वडोदरा महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी पाणीपुरीसाठी वापरण्यात येणारे खराब, सडलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त केल्या आहेत. अधिकऱ्यांनी केलेल्या छापेमारीमध्ये खराब तेल, सडलेले पीठ, सडलेले बटाटे आणि किडे झालेले हरभरा दाळ जप्त केली आहे. याचाच वापर पाणीपुरी बनवण्यासाठी आणि विक्रीसाठी केला जात होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत पावसाळा संपेपर्यंत शहरामध्ये पाणीपुरी विकण्यावर पूर्णपणे बंदी लागू केली आहे. दुषित पाणीपुरी मध्ये टायफाईड, फूड पॉयझनिंगचा धोका वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील हुजरात पागा, हाथीखाना, तुलसीवाडी, समा, छामीगाव,खोडियानगर, नवायार्ड, वारसिया नरसिंह टेकडी, सुदामा नगेर या भागातील पाणीपुरी बनवणाऱ्या ५० पेक्षा जास्त ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी ४ हजार किलो पाणीपुरी, ३५०० किलो बटाटे आणि हरभरा दाळ, २० किलो तेल आणि १२०० लिटर अॅसिडयुक्त पाणी जप्त करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें