प्रतिनिधी.समशेर खान.
सेलू ÷शहरातील क्रांती चौकात माजी सैनिक एकता संघटनेच्या वतीने सेलूत कारगिल युद्ध विजय दिवस साजरा करण्यात आला.
या वेळी उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांच्या हस्ते क्रांतीची ज्योत पेटून शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, माजी सैनिक लक्ष्मण शेरे, विठ्ठल सिंग ठाकूर,सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड, आरोग्य विस्तार अधिकारी सुधाकर धायडे, देवगिरी बँकेचे शाखा व्यवस्थापक सुनील देशमुख, सुभाष मोहकरे, विजय चौधरी यांची प्रमूख उपस्थिती होती.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते कारगिल युद्ध विजय दिना निमित्त शहरातील माजी सैनिकांचा पुष्प गुछ देऊन सत्कार करण्यात आला
माजी सैनिक भगीरथजी गायकवाड व पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी मनोगत व्यक्त केले,
विठ्ठल शिंदे, सखाराम महाजन, सावंत, चारठाणकर, नाना मुळावेकर, एकनाथ जाधव, बंडू तिवारी, प्रकाश देउळगावकर, शिवाजीराव झोल,पद्माकर कुलकर्णी विष्णू बागल, आवधूत लिपणे, गोविंद शिंदे तसेच अनेक प्रतिष्ठीत नागरीक , राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक कार्यकर्ते चळवळीतील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सखाराम महाजन यांनी केले तर सुत्रसंचलन योगेश ढवारे यांनी केले,आभार सुनिल गायकवाड यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें