प्रतिनिधी.मुस्तखीम बेलदार.
मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील शेतकरी वडील व मुलाचा शेतातील शेततळ्यात बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. पाडुरंग रंगनाथ लाडाने (४५) आणि रमेश पाडुरंग लाडाने (२०) असे या बाप-लेकाचे नाव आहे.
मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील रहिवासी अमोल उर्फ रमेश लाडाने हे शेत तळ्याच्या ताडपत्रीला व्यवस्थित करण्यासाठी शिवारातील शेततळ्यावर चढला असता पाय घसरुन शेत तळ्यात पडला. त्यांला पोहता येत नसल्याने त्यांने आरडा ओरडा सुरू केला. त्याच्या पाण्यात पडण्याचा आवाजाने आणि आरडा ओरड्याने त्यांचे वडील पाडुरंग लाडाने हे त्याला वाचविण्यासाठी शेततळ्यात उतरले. परंतु निसटत्या प्लास्टिकमुळे बाप-लेकाचा शेत तळ्याच्या बुडाले. त्यानंतर इतरांनी त्यांनी शेततळ्यातून बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मानवत येथे आणले असता डॉक्टरांनी तपासणी दरम्यान दोघांनाही घोषीत केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें