पञकारावर केलेल्या भ्याड हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा , भोकरदन पञकार संघाची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 18 जुलाई 2018

पञकारावर केलेल्या भ्याड हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा , भोकरदन पञकार संघाची मागणी.



  प्रतिनिधी  भोकरदन :

   औरंगाबाद येथिल दिव्य मराठी डिबी स्टारचे पञकार रवी रामभाऊ गाडेकर यांच्यावर शनिवारी राञी  गजानन मंदिर औरंगाबाद रोड वर हेडगेवार रूग्णालयासमोर झालेल्या भ्याड हल्याचा निषेद करत,भोकरदन येथिल उपविभागीय कार्यालयाला निवेदन येऊन दौषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. 
  औरंगाबादचे पञकार रवी गाडेकर यांनी अवैद्य सावकाराविरोधात २० ते २४ जुन या दरम्यान सावकारीचा पाश या याची चार भागाची वृत्तमालिका प्रसिध्द केली होती,यामध्ये जिल्हा निबंधक कार्यालयातील काही अधिकारी या अवैद्य सावकरांना जाणीवपुर्वक पाठीशी घालत असल्याचा खुलासा त्यात होता,आणि या कार्यालयातुन गाडेकर यांना धमक्यांचे फोन येत होते,
  १४ जुलै रोजी राञी १०:३० सुमारास रवी गाडेकर हे औरंगाबाद येथिल गजानन रस्त्याने पायी जात असतांनी पल्सर दुचाकीवरून आलेल्या गुंड त्यातील एकाने यशवंत देवकर यांच्या नादी का लागतोस? असे म्हणत शिवीगाळ करून पाठीमागुन चाकुहल्ला करत पळ काढला..
  सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन,पञकारांवर वेळोवेळी होणारे हल्ले थांबवुन  या हल्ले खौरांवरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी,भोकरदन पञकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.या निवेदनावर तालुका अध्यक्ष महेश देशपांडे,जिल्हाकार्याध्यक्ष फकिरा देशमुख,गणेश औटी,सांडु नामदे,विजय सोनवणे,रविंद्र देशपांडे,नानासाहेब वानखेडे,सुनिल जाधव,सुरेश बनकर,दिपक सोळुंके,तुषार पाटील,वैभव सोनवणे,रमेश इंगळे,युवराज पगारे,शेख सलिम,मधुकर सहाने,इसरार पठाण,विश्वास धसाळ,इमरान खान,शेख इरफान,रितेश देशपांडे,सुरेश गिराम,सुभाष लहासे,मिर्झा जुल्फेखार,कमलकिशोर जोगदंडे,विजयानंद पगारे,प्रताप शेळके आदींच्या पञकारांच्या साक्षर्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें