राजकीय सहभागातून विकास होत असतो-प्रा. डाॅ. भारत राठोड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 19 जुलाई 2018

राजकीय सहभागातून विकास होत असतो-प्रा. डाॅ. भारत राठोड.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि. १९जुलै २०१८

जगातील कोणत्याही समुदायाचा विकास हा तेथील राजकीय विचार प्रणालीवर अवलंबून असतो व राजकीय सहभागामधून त्या सामाजिक घटकांचा विकास होत असतो असे मत प्रा.डॉ. भारत राठोड यांनी त्यांच्या सत्कार समारभांच्या वेळी राज्यशास्त्र विभागात आयोजीत कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
शहरातील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने प्रा. डॉ. भारत राठोड यांनी परभणी जिल्ह्यातील स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये बंजारा समाजाचा राजकीय सहभाग या विषयावर प्रा. डॉ.  उमाकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर करून पी.एच् डी. पदवी मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तर देताना या महाविद्यालयातील ग्रंथांचा व प्राध्यापकांच्या सहकार्याचा माझ्या संशोधनाच्या कार्यात मोलाचा वाटा आहे. असे मत व्यक्त करताना कोणत्याही समाजाचा विकास हा राजकीय सहभागाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून आपण ज्या समाजात  व भागात रहातो,  त्याचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शक सोनवणे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तसेच विविध संशोधन कार्यासाठी मला वरपुडकर महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सर्व प्राध्यापक व ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले असे मत व्यक्त केले. यावेळी वाणिज्य विभागाच्या वतीने बँकेच्या राष्ट्रीयकरण दिनानिमित्त भित्तीपत्रकाचेही विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या सत्कार समारंभास हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वर कदम, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, विभाग प्रमुख प्रा. डाॅ.कल्याण गोलेकर, प्रा. डॉ. मारोती कच्छवे, प्रा. डॉ. मुंकुदराज पाटील, प्रा. डाॅ.रणखांब, प्रा. डाॅ. सोनसळे, प्रा. डाॅ. बालासाहेब काळे, प्रा. डाॅ. बापुराव आंधळे, प्रा. डॉ. बळीराम शिंदे, प्रा. डॉ. अशोक चव्हाण, प्रा.विकास रागोले,  प्रा. संदिपकुमार देवराये, प्रा. गोविंद वाकणकर, प्रा.विठ्ठल मुलगीर, प्रा.डॉ. पंडित राठोड उपस्थित सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें