सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर - नवजात अर्भकास पळवल्याचा प्रश्न विधानसभेत गाजला; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 18 जुलाई 2018

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर - नवजात अर्भकास पळवल्याचा प्रश्न विधानसभेत गाजला;



सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.१७ ) - सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून नवजात अर्भकास पळविल्याची घटना घडूनही येथील सुरक्षा व्यवस्था अद्यापही वाऱ्यावरच असुन सिसिटीव्ही कॅमेरे बंदच असतात, दुरुस्तीकडे लक्ष दिल्या जात नाही. सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात सोयगाव - भोकरदन - जाफराबाद येथून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. रोज कमीतकमी चाळीस महिलांची येथे प्रसुती होते, तर पाचशे पेक्षा अधिक रुग्णांची बाहय रुग्णालयाच्या दैनंदिनी तपासणीसाठी येत असतात. या रुग्णालयाच्या सुरक्षेचा भार अवघ्या दोन सुरक्षारक्षकांवरच आहे.
रुग्णालयाचा परिसर आणि तेथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने हा भार या दोन सुरक्षारक्षकांकडून पेलवणे अशक्यच होत असुन उपजिल्हा रुग्णालयातील सिसिटीव्ही कॅमेरे बंदच असल्याने नवजात अर्भकास पळविल्याची घटना येथील उपजिल्हा रुग्णालयात घडली असुन काय काय उपाययोजना करण्यात आल्या असा प्रश्न माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी नागपुर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला असुन आरोग्य विभागाची चांगलीच धाबे दणाणले आहे.
सिल्लोड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातून नवजात अर्भकास पळविल्याची घटना बुधवार (दि.३१ जानेवारी ) रोजी घडली होती. सदर प्रकरणी सिल्लोड येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील प्रकरणाबाबत विचारणा करण्यात आली आहे.
सदरील प्रकरणाबाबतची गंभीर बाब लक्षात घेता तसेच उपजिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार लक्षात घेता नागपुर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी प्रश्न उपस्थित करताच आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असुन महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पाऊल उचलण्यात आले असुन सिसिटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले असुन रुग्णालयात रिक्त असलेली पदे तसेच औषधींचा असलेल्या तुटवड्याबाबत तात्काळ उपाययोजना करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सदरील प्रकरणांबाबत आरोग्य मंत्र्यांकडून तात्काळ चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें