"सोनपेठ पोलीसांना चोरांचे आव्हान.मुख्य चौकातील कृषि केंद्र फोडले"
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०२जुलै २०१८शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या वसंतराव नाईक कृषि सेवाकेंद्रावर दि.२९ जूनच्या मध्यराञी दुकानाच्या मागील भागाचे पत्रे उचकटुन चोरांनी दुकानातील रोख रक्कम व बियांनाच्या पाकीटावर डल्ला मारत पोलिसांसमोर आव्हान ऊभे केले आहे.
चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कमेसह महत्त्वाचे कागदपत्र, फाईली, बिले अस्ताव्यस्त करून कापसाच्या बियांनाचे ८४००० रुपयांच्या किंमतीचे ११५ पाकिटे घेऊन पोबारा केल्याची तक्रार दुकानाचे मालक गोविंद राम राठोड यांनी सोनपेठ पोलिसात केली असून तक्रारदाराच्या तोंडी तक्रारीवरुन सोनपेठ पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ४६१ नुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. सदर चोरीची घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असुन पोलीस चोरट्यांच्या शोधात आहेत; मात्र वृत्त लिहीपर्यंत चोरांचा सुगावा लागला नाही असे तक्रारदाराने आमच्या प्रतिनिधीस बोलताना सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें