माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने सोनपेठ येथे वृक्षारोपन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 2 जुलाई 2018

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने सोनपेठ येथे वृक्षारोपन.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०१ जुलै २०१८
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या १०५व्या जयंती दिनाचे औचित्य साधून येथील बुलढाणा अर्बण बँक शाखा सोनपेठ, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास सोनपेठ व,गोरसेना यांच्या वतीने देशी झाडांच्या रोपांचे वृक्षारोपन नुकतेच करण्यात आले.
जिजामाता पब्लिक स्कूल, व्हिजिन पब्लिक स्कूल, जि.प.कें. कन्या शाळा सोनपेठ आदी ठिकाणी यानिमित्त वृक्षारोपन करण्यात आले. या प्रसंगी बुलढाणा अर्बन बँकेचे शाखा व््यवस्थापक प्रल्हादराव पवार, व्व्हिजिन पब्लिक स्कूलचे संस्थाध्यक्ष बबनराव पवार, कै.बाजीराव देशमुख विद्यालया शेळगाव (म.) चे शिक्षक वृक्षमित्र महेश जाधव (नै.प.सं.व मा.वि.जिल्हाध्यक्ष), प्रतिष्ठित व्यापारी संतोष निर्मळे, पत्रकार रवींद्र देशमुख,   विजय राजभोज (नै.प.सं.मा.वि.तालुकाअध्यक्ष),भगवान राठोड, अशोक पवार, सैफुल्ला सर यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. या प्रसंगी जिजामाता प.स्कुलचे मु.अ.अजय सर, परमेश्वर राठोड, दिलीप चव्हाण, बाळासाहेब पवार, प्रल्हाद आळसे आदींसह बुलढाणा अर्बन बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें