आश्वी प्रतिनिधी:-
अकोले तालुक्यातील केळी रुम्हणवाडी गांवात शनिवार दि. 30 जून 2018 रोजी मालदाड येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांचा गावचे उपसरपंच श्री भाऊसाहेब
बिन्नर यांचा हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला , कृषिदूतांना सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
ह्याप्रसंगी गावचे ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आणि गावातील प्रतिष्ठित शेतकरी उपस्थित होते. कृषीदूतांनी पुढील चार महिन्यांतील कृषी कार्यानुभव कार्यक्रमातील
उपक्रमाविषयी माहिती दिली . यात त्यांनी अवगत केलेले ज्ञान शेतकऱ्यांपर्यत पोहोचविण्याचा व शेतकर्यांच्या समस्या सोडविण्याचा आणि शेतकर्याकडून जास्तीत जास्त प्रात्यक्षिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न असणार आहे असे मत कृषीदूत प्रतिनिधी यांनी व्यक्त केले .
या कृषीदूतांमधे अभिषेक गव्हाणे, प्रशांत डमाले, महेश गायधनी,रमेश जायभाय, हेमंत जाखेरे, जी नविनकुमार, के राहुल इ. समावेश आहे
यांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हारदे सर, प्रा. दसपुते सर,प्रा. तायडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें