राज्यातील राईनपाडा कुरुला व लातूर येथील नाथजोगी , भोई, व वडार जमातीतील हत्याकांडाच्या निषेधार्थ राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघ शाखा लोहाच्या वतीने लोहा तहसीलवर आज शुक्रवारी (ता.०६)नाथजोशी,वडार,भोई,मसानजोगी ,जोशी,वासुदेव कैकाडी, नंदीवाले,वैदू,मातंग,आणि शहरातील सर्व समाज बांधवांचा निषेध मोर्चा हजारोच्या संख्येने घडला.सदर मोर्चा राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाचे संस्थापक डॉ.संजय बालाघाटे यांच्या नैत्रात्वाखाली शनीमंदिरापासून निघाला . या मोर्च्यात मोर्चेकरांनी राईनपाडा हत्याकांडातील आरोपीना फाशी झाली पाहिजे. कुरुला येथील मयत अनिता हुसकलवाड व लातूर येथील प्राध्यापक अविनाश चव्हाण यांच्या मारेक-यांना अटक झाली पाहिजे हि मागणी करत भटक्या विमुक्तांना ऑट्रासिटीचे रक्षण मिळाले पाहिजे. अत्याचार गृस्त कुटुंबियांचे पुनर्वसन शासनाने करावे.
वरील घटनांची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. या मोर्च्यात वडार , नाथजोगी, कैकाडी, जोगीवाले, नंदीवाले, वासुदेव, मातंग,वैदू,आदी जमातीचे लोक आपल्या पारंपारिक वेशात सहभागी झाले होते. हा मोर्चा तहसीलला पोहचल्यावर मोर्च्याचे रुपांतर सभेत होऊन भटक्या विमुक्तांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी मोर्चेकरूंना डॉ.संजय बालाघाटे पंचशील कांबळे सोनू संगेवार,बालाजी जाधव,शिवराज धाढेल , विष्णू शिंदे , बाबू डिकळे ,माउली पवार, मारोती कोळी, दत्ता शेटे , व माधव डोम्पले यांनी मार्गदर्शन करून सरकारचा निषेध नोंदवला. मोर्च्याच्या यशस्वीतेसाठी मारोती पंदलवाड , शाम मंजलवाड , ज्ञानेश्वर भिसे,अर्जुन नक्कलवाड , शिवाजी मंजलवाड , परमेश्वर मोरे, राजू वायफळकर , बालाजी पवार,लक्की फुलवरे, मारोती मोरे,यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले,नायबतहसीलदार यांना निवेदन देऊन मोर्च्याची सांगता झाली. यावेळी पोलीस निरीक्षक अभिमन्यू सोळुंके , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें