माले टाकळी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 2 जुलाई 2018

माले टाकळी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

माले टाकळी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.


राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष यांच्या मनमानी कारभारामुळे गावकऱ्यांची भाजप कडे वाटचाल.


सेलू प्रतिनिधी

तालुक्यातील राष्ट्रवादीच्या वाढत्या राजकारणाला व बोगस काम करण्याच्या पद्धतीला जनता मात्र दिवसेंदिवस त्रस्त होत आहे प्रत्येक गावात गटबाजीचे राजकारण करून ग्रामीण भागाच्या विकासाला ब्रेक लावण्याचे काम हे गावातील कार्यकर्ते करीत आहेत माले टाकळी येथील ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात असून सरपंच कल्पना विनोद ताठे ह्या आहेत या सरपंच झाल्यापासून गाव सोडून परगावी राहण्यासाठी गेल्या आहेत व गावातील ग्रामपंचायतीचा कारभार हे त्यांचे सासरे बाबाराव ताठे व सेलू येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माऊली ताठे हे दोघे जाने पाहतात गावातील ग्रामस्थांच्या अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी कोणीच तयार नसल्यामुळे गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास ताठे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या व तालुका अध्यक्ष माऊली ताठे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांनी सोमवार दिनांक 2 जुलै रोजी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करून गावातील मोठी तरुणांची फळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा विश्वास यावेळी देऊन विलास ताठे यांनी राष्ट्रवादीला रामराम केला गावातील प्रतीक विकास काम हे तालुका अध्यक्ष माऊली ताठे त्यांना विचारल्याशिवाय होत नाहीत तसेच गावातील प्रत्येक काम हे स्वतःच करतात त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून समस्त गावकरी व ग्रामपंचायत सदस्य लवकरात लवकरच भाजपामध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे यावेळी विलास भुजंगराव ताठे यांनी बोलताना सांगितले


गावातील बोगस कामाची चौकशी करण्याची मागणी............ विलास ताठे
गावातील बोगस संडास घरकुल पांदण रस्ते विहीर पुनर्भरणाचे शेततळे बंधारे तसेच गावातील सिमेंट रस्ते हे पूर्णतः बोगस असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत चाललेला आहे यासंदर्भात गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास ताठे यांनी सोमवार 2 जुलै रोजी सकाळी 11 वाजता माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आणि गावकऱ्यांच्या विकासासाठी लवकरात लवकर ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे समक्ष भेटून माले टाकळी येथील बोगस काम करणाऱ्या ग्रामपंचायतीची चौकशी व दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी सांगितले या जाहीर प्रवेशाच्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र डासाळकर पंजाब पोळ आत्माराम रोडगे राजू भाऊ घोडके बाळासाहेब लिपणे आदींची यावेळी उपस्थिती होती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें