नगरसेवक आनंत भदर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त फळाचे वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 2 जुलाई 2018

नगरसेवक आनंत भदर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त फळाचे वाटप.


मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०२: मानवत शहराचे सामाजिक कार्यकर्ते  तथा   फुले,शाहु,आंबेडकर चळवळी चे नेते ,लोकप्रिय नगरसेवक आनंत मामा भदर्गे  यांच्या वाढदिवसानिमित्त  दि.१जुलैरोजी दुपारी २ वाजता  मानवत येथील सुमनाजली मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थिना  व ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी छगन भदर्गे ,विनोद रहाटे ,कचरुलालाजी बारहाते,विजय खरात,पप्पु गायकवाड ,रईस चाऊस,संपत पंडित,विजय भदर्गे ,शुभम भदर्गे यांच्यासह आंबेडकरवादी युवामंचचे पदाधिकारि यावेळी उपस्थीत होते. शहरातील विविध सामाजीक संघटनाच्या वतीने हि त्यांचा मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.
गोर गरिबाचे कैवारी म्हणुन ओळखले जाणारे तसेच शहरातील सामाजीक क्षेञात अग्रेसर राहुन समाजसेवा करणारे नगरसेवक आनंत मामा भदर्गे याच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विविध सामाजीक व राजकिय क्षेञातुन त्याचा  वाढदिवस साजरा करण्यात आला.आंबेडकरी संघटना व पञकार संघटनाच्या वतीने हि त्यांचा सत्कार करण्यात आला आहे व विविध क्षेञातुन त्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें