पिक विमा प्रकरणी सोनपेठ कडकडीत बंद. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 5 जुलाई 2018

पिक विमा प्रकरणी सोनपेठ कडकडीत बंद.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि. ०५जुलै २०१८
पिक विमा प्रकरणी आयोजित आजच्या आंदोलनास प्रतिसाद देत कडकडीत पाळण्यात आला. व्यापारी प्रतिष्ठानासह शाळा महाविद्यालये ही बंद ठेवण्यात आली.
सोनपेठ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा सुमारे साडे तेरा कोटी पेक्षा अधिक रक्कमेचा पिक विमा रिलायन्स इनश्युरंस कंपनीने प्रशासकीय चुकांमुळे नाकारला आहे. हक्काचे साडे तेरा कोटी रुपये मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक आंंदोलने केली. परभणी जिल्हा पिक विमा संघर्ष समितीने याच मुद्द्यावर सर्व पक्षीयआंदोलन सुरु केले आहे ता.५ रोजी परभणी जिल्हा बंदला प्रतिसाद देत सोनपेठ तालुका संपुर्ण बंद ठेवण्यात आला. सोनपेठ शहरातील बाजारपेठ१००% बंद ठेऊन व्यापारी महासंघांने शेतकऱ्यांच्या मागणीस पाठिंबा दिला. या वेळी तालुक्यातील शाळा महाविद्यालये ही सोडुन देण्यात आली. दुपारी पिक विमा संघर्ष समितीच्या वतीने सोनपेठ तहसीलदार यांना निवेदन दिले. या आंदोलनात संभाजी ब्रिगेड चे शिवाजी कदम. शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदु, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मधुकर निरपणे, तालुकाध्यक्ष रंगनाथ रोडे, भगवान पायघन, भागवत पोपडे, राष्ट्रवादी चे दिनकर तिथे, भगवान राठोड, नगरसेवक सुनील बर्वे, पिक विमा संघर्ष समितीचे विश्वंभर गोरवे, व्यापारी महासंघाचे कृष्णा कुसुमकर, माऊली जोगदंड, अंगद काळे, आण्णा जोगदंड, रामेश्वर भोसले, राजेश कदम ,भागवत मुलगीर, विष्णु मुलगीर, गणेश पांडुळे, बालासाहेब सावंत, मधुकर फड, मुरली बहादुर, राजाराम बर्वे, राजाभाऊ राठोड, बाबासाहेब गर्जे, गोपीनाथ जाधव, विनोद देशपांडे, रामराव मोकाशे यांच्यासह मोठ्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
उद्या दि.०६ जुलै रोजी शिवाजी चौक सोनपेठ येथे सकाळी ११ वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पिक विमा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें