परभणी जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी रब्बी व खरीप हंगामात रिलायन्स कंपनीकडे पिकवीम्याचा भरणा केला होता. परंतू रब्बी व खरीप हंगामातील एकही पिक शेतकऱ्यांना हाताशी आले नाही. परिणामी दुष्काळी परिस्थिती जिल्ह्य़ात निर्माण झाली होती. परंतू जिल्हा प्रशासन, रिलायन्स कंपनी आणि कृषी अधिकारी यांनी संगणमत करून आणेवारीची आकडेमोड करून शेतकऱ्यांना पिकवीम्याचा मोबदला मिळण्यापासुन वंचित ठेवले आहे. या निषेधार्थ गेल्या अनेक दिवसांपासुन जिल्हास्तरावर सर्वपक्षीयांच्या वतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली परंतु सरकार जुमानत नसल्याने आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या आवाहनाला व्यापा-यांनी प्रतिसाद देत दुपापर्यंत आपआपली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला. या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या बंदमध्ये जि. प. अर्थसभापती अशोकराव काकडे, शिवसेनेचे गटनेते राम नाना पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष छगन शेरे, पंचायत समितीचे सभापती पुरूषोत्तम पावडे, काॅग्रेसचे मिलिंद सावंत, पवन आडळकर, विनोद तरटे, शिवसेनेचे मनिष कदम, जयसिंग शेळके, माकपचे काॅ.रामकृष्ण शेरे, दत्तुसिंग ठाकूर, माऊली ताठे, बजरंग आरकुले आदी मंडळी सहभागी झाले होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें