चारठाणा.( प्रभाकर कुर्हे )
चारठाणा येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाकडे असलेला प्रभारी पदभार रद्द करुन येथे कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकार्याची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.
जिंतुर तालुक्यातील १७ सदस्य असलेली चारठाणा हि सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.येथे ग्रामविकास अधिकार्याचे पद असतांना मागच्या अनेक वर्षापासुन येथील पदभार ग्रामसेवका कडे देण्यात अाला आहे.संबधित ग्रामसेवका कडे चारठाणा व्यतीरिक्त अन्य चार ग्रामपंचायतीचा पदभार असल्याने संबधित ग्रामसेवक हे पुर्ण वेळ देऊ शकत नसल्याच्या ग्रामस्थांच्या व ग्रा.पं.सदस्यांच्या तक्रारी आहेत.संबधित ग्रामसेवक परभणीला राहात असल्याने व त्याच्याकडे अन्य चार ग्रामपंचायतीचा पदभाे असल्याने अनेक दिवस चारठाणा येथील ग्रामपंचायत कडे फिरकत नसल्याने वसुलीवर परिणाम होत अाहे तसेच नागरीकांची देखील छोटी मोठी कामे अडकुन पडत आहेत.जिंतुर पंचायत समिती अंर्तगत काही ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत.परंतु त्यांनी कामाचा ताण नको म्हणुन अधिकार्याशी सुत जुडवुन छोट्या ग्रामपंचातीचा पदभार घेतला आहे.
एकंदरीत येथील ग्रामसेवकाचा प्रभारी पदभार रद्द करुन येथे कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकार्याची नियुक्ती करावी व ग्रा.पं.कारभारात सुधारणा करावी अशी मागणी होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें