राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सौ चित्राताई वाघ परभणी जिल्हा दौऱ्यावर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 12 जुलाई 2018

राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सौ चित्राताई वाघ परभणी जिल्हा दौऱ्यावर.


 
   सेलू  (समशेर पठाण )
                 राज्यात सगळीकडे महिलावर होणारे अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी परभणी जिल्ह्यातील महालावरील अत्याचाराच्या घटनेचा आढावा घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पंतप्रधान पिकविमा योजना अंतर्गत विमा कंपनीने केलेल्या फसवणुकीची चौकशी करण्यासाठी १३ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ चित्राताई वाघ ह्या  परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत अशी माहिती परभणी रा.काँ .महिला जिल्हाध्यक्षा तथा जि.प. उपाध्यक्षा सौ भावनाताई अनिलराव  नखाते यांनी दिली आहे
                   महिलांवरील वाढते अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  प्रदेशपातळीवर विविध उपायोजना राबविण्याचा निर्णय राकाँच्या महिला प्रदेशाध्यक्षा  चित्राताई वाघ यांनी घेतला असून याच पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील महिलावरील अन्याय अत्याचार याबाबतचा आढावा घेण्यासाठी राकाँच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ ह्या १३ जुलै रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सकाळी १० वा. जिल्हाधिकारी पि शिवशंकर,व पोलिस अधिक्षक दिलीप झळके यांची भेट घेऊन त्याबाबतचा आढावा घेणार आहेत याचवेळी  परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पंतप्रधान पिकविमा योजना अंतर्गत संबंधित विमा कंपनीकडून फसवणूक झाली याबाबतचा आढावा घेऊन संबंधित कंपनीविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे त्यानंतर ११वा.वसमत रोडवरील  राष्ट्रवादी काँग्रेस भवन  कार्यालयात चित्राताई वाघ या जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामीण महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून महिला संघटन या बाबतीत मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे महिला पदाधिकार्‍यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान रा. काँ. महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते व शहराध्यक्षा नंदाताई राठोड यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें