अपना मक़ाम पैदा कर.विद्यार्थी,शिक्षक व पालक, शैक्षणिक सम्मेलन संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 12 जुलाई 2018

अपना मक़ाम पैदा कर.विद्यार्थी,शिक्षक व पालक, शैक्षणिक सम्मेलन संपन्न.


पालम/अनीस खुरेशी

पालम शहरातील मदरसा अरबीया सालमतुल खादेमा व तालीमुल कुरआन.या मदरशात बुधवारी दुपार दोन वाजता अंतराष्ट्रीय प्रेरणा कोच,प्रमूख वक्ते व राबता फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सय्यद सईद अहेमद सर यांच्या प्रमुख उपस्थितीत
*अपना मक़ाम पैदा कर*

*विद्यार्थी,शिक्षक व पालक, शैक्षणिक सम्मेलन संपन्न झाले*
शहरातील डाॅ.जाकेर हुसैन ऊर्दू शाळा,इंदिरा गांधी ऊर्दू शाळेसह मदरसा अरबीया सालमतुल खादेमा व तालीमुल कुरआन.या मदरशातील विद्यार्थ्यांनी शहरात रॅली काढुन कार्यक्रमाची शोभा वाढली या कार्यक्रमाचे काॅर्डीनेटर मो.नासेर खान यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन
परभणी येथील दि.मेमन मर्चंट असोसिएशन,व परभणी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने संपुर्ण जिल्ह्य़ात आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे कनव्हिनर डाॅ.सलीम मोहियोद्दीन साहब  तर काॅर्डीनेटर मो.नासेर खान मुख्याध्यापक डाॅ.जाकेर हुसैन ऊर्दू शाळा पालम होते तर स्वागताध्यक्ष जफरूल्ला खान,व मो.जियाओद्दीन तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमानउल्ला खान साहब तर मार्गदर्शन म्हणून इंजीनियर मोहम्मद अब्दुल रशीद साहब होते. प्रमुख पाहुणे म्हणून जमीयत उलेमा ए हिंदचे पालम तालुकाध्यक्ष मौलाना मो.मुदस्सीर साहब क़ासमी,मौलाना महेफुज़ अली बेग साहब हुस्सामी, मौलाना मो.रफीक साहब इशाअती,हिदायतुल्ला खान साहब (मा.सभापती)शेर खान अमीर साहब पालम,असदउल्ला खान उपस्थित होते.सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी अकबर खान,रशीद खान,गौसोद्दीन भाई पत्रकार,अनीस खुरेशी पत्रकार,सलमान खान,शेख जावेद,हबीब जाफर,हक्काणी पठाण,फैसल चाऊस,सय्यद विखार,मो.युनुस,असलम खान,जब्बार भाई,एज़ास खान,माजीद पठाण,शाहबोद्दीन भाई पटेलसह आदींनी परिश्रम घेतले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें