कपाशी पिक करपले - बाेंडअळींचे थैमान; तात्काळ उपाययाेजना करा:- आ.अब्दुल सत्तार ! सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 जुलाई 2018

कपाशी पिक करपले - बाेंडअळींचे थैमान; तात्काळ उपाययाेजना करा:- आ.अब्दुल सत्तार ! सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा;


सिल्लाेड (प्रतिनिधी) दि.२८
सततच्या दुष्काळी परिस्थितीतून यंदा तरी सुटका हाेईल अशी अपेक्षा हाेती.मात्र यंदा पुन्हा कपाशीच्या बालअवस्थेतच सिल्लाेड तालुक्यात अजित सिड्स व ब्रह्मा या कंपन्यांची कपाशी करपली असून काही कपाशीवर गुलाबी बाेंडअळींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक-यांवर माेठे संकट उभे राहीले आहे.या विदारक परिस्थितीची पाहणी माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी करून कृषी अधिका-यांना तात्काळ पंचनामे करून उपाययाेजना कराव्यात व तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी असी मागणी माजीमंञी आ .अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

गतवर्षी कपाशीवर गुलाबी बाेंडअळींचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात झाल्याने कापुस उत्पादक शेतकरी देशाेधडीला लागले हाेते.तर पावसाअभावी मका हातुन गेली हाेती.सिल्लाेड व साेयगाव तालुक्यातील मका व कपाशी हे दाेन मुख्य पिक हातुन गेल्याने शेतकरी पूर्णपने खचला हाेता. शेतक-यांवर ओढवलेल्या संकटातुन बाहेर काढुन त्यांना शासकीय मदत मिळावी यासाठी आ.अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर आंदाेलने करण्यात आली.हिवाळी अधिवेशनावर माेर्चा नेऊन झाेपेचे साेंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यात आले.अखेर सरकारकडून बाेंडअळींची मदत पदरी पाडून घेण्यात आ.अब्दुल सत्तार यांना यश आले.
गतवर्षीचा दुष्काळ व बाेंडअळीं नुकसानीचा अनुभव पाठीशी असतांना यंदा पुन्हा झालेले नुकसान तरीही नव्या उमेदीने खरीपाची पेरणी केली.मात्र यंदाही निसर्गाचा लहरीपना अनुभवयाला येत असून ऩिम्मा पावसाळा झाला असला तरी अजुनही दमदार पाउस तालुक्यात झाला नाही.यामुळे खरीप पिक धाेक्यात सापडली असून यातुन माेठे संकट उभे राहीले आहे.शिवाय गतवर्षी पडलेली बाेंडअळीं यंदा कपाशीवर बालअवस्थेतच पडल्याने कापुस उत्पादक शेतकरी खचला आहे शिवाय अजित सिड्स व ब्रम्हा या कंपनीच्या कपाशी करपल्या आहेत याची नुकसान भरपाई कंपन्यांनी व शासनाने तात्काळ द्यावी असी मागणी करण्यात येत आहे.

चाैकट :- बाेंडअळी व दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंञ्यांसाेबत बैठक

गतवर्षीच्या बाेडअळीच्या धास्तीने कपाशीची लागवड यंदा माेठ्या प्रमाणात घटली.ज्या कापुस उत्पादकांनी कपाशीचा पेरा केला त्या क्षेत्रावर पुन्हा बाेंडअळीं धावल्याचे व काही वाणांचे पीक करपल्याचे निर्दशनास आले आहे.ही बाब गंभीर आहे त्यातच सिल्लाेड व साेयगाव मध्ये दमदार पाउस न झाल्याने खरिप हंगाम धाेक्यात सापडला आहे.शेतक-यांवर ओढवलेल्या संकटाबाबत विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व मी मुख्यमंत्री महाेदयांसाेबत याविषयी सोमवारी मुंबईत बैठक घेणार असल्याचे सांगितले .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें