चारठाणा येथे मराठा आरक्षणसाठी एक तास चक्का जाम . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 जुलाई 2018

चारठाणा येथे मराठा आरक्षणसाठी एक तास चक्का जाम .


चारठाणा  /  प्रतिनीधी.
मागील दोन वर्षांपासून मराठा समाजातील विविध संघटना एकत्र येऊन वेगवेगळ्या पद्धतीने समाजाच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत मात्र एवढा वेळ जाऊनही राज्य सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने पुन्हा एकदा मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे याच अंतर्गत तालुक्यातील चारठाणा येथे  सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार २८ जुलै रोजी सकाळी ११  वाजता एक तास चक्का जाम अंदोलन केले.या वेळी  चारठाणा पोलीस ठाण्याचे साहयक पोलीस निरीक्षक अजय कुमार पांडे यांना निवेदन सादर करून परभणी येथील अंदोलन का वरील खोटे  गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. या अंदोलनाला   मुस्लिम बांधवाने देखील पाठिंबा दर्शविला आहे.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्य शासनाने लक्ष वेधून घेण्याकरिता क्रांती दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथे भव्य मराठा क्रांती मूक मोरच्याची सुरुवात करण्यात आल्यानंतर   चारठाणा टि पाॅइटवर एक तास चक्का जाम अंदोलन करण्यात आले अदोलना नंतर विविध मागण्याचे निवेदन   साहयक पोलीस निरीक्षक अजय कुमार पांडे यांना  देण्यात आले. या वेळी  किरण देशमुख,  निलेश चव्हाण, रूस्तुम देशमुख,  सोपान चव्हाण,  गजानन चव्हाण, प्रकाश देशमुख, सुनिल चव्हाण  आकाश गजमल, नामदेव चव्हाण, संदीप देशमुख, मौलाना अ.गफार, सलीम काझी, जलील इनामदार, तैसीन देशमुख, प्रदीप धुमाळ, नवनाथ चव्हाण, बाळासाहेब देशमुख, तातेराव चव्हाण, एकनाथ चव्हाण,किशोर देशमुख, कुंडलिक चव्हाण, यांच्या सह आनेकाच्या सह्या आहेत. दरम्यान चारठाणा पोलीस ठाण्याचे साहयक पोलीस निरीक्षक अजय कुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राऊत पोलीस नाईक मंचक जाधव इघारे मोरे आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.या वेळी महसुल प्रशासनाने तलाठी आर.एन. गायकवाड मंडळ आधिकारी जि.डी.चक्रवार यांची देखील उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें