पालम/अनीस खुरेशी
पालम शहरातील तहसील कार्यालयात मंगळवारी तहसीलदार तेजस्वी गोरोबा जाधव यांनी तहसील कार्यालयातील सर्व कर्मचार्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात आला.कार्यालयातील कर्मचार्यांची कामात कामचुकार पणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे मत यावेळी त्यांनी केले यावेळी नायब तहसीलदार श्रिरंग कदम साहेब,इसहाक पटेल,काबळे,आदी कर्मचारी उपस्थित होते.कापसावरील गुलाबी रंगाच्या बोंडअळीचे अनुदान,गारपीटग्रस्तांचे अनुदान,संजय गांधी निराधार योजनेचे रखडलेले अनुदान,तृटीत टाकलेल्या विद्यार्थीचे जातीचे प्रमाणपत्र व इतर लागणारे प्रमाणात तातडीने वाटप करावे,व शेतकऱ्यांच्या सातबारा साठी होणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी संबंधित तलाठ्यांना सुचना देऊन सर्व तालुक्यातील तलाठ्यांना आपआपल्या सज्जा वर राहण्याचे आदेश दिले,या वेळी तलाठी संघटनेचे अध्यक्ष विजय राठोड,चंद्रकांत भदाले,हबीब पठाण,मेहपती काबळेसह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें