भारतीय जैन संघटना भोकरदन तालुका अध्यक्षपदी मयूर बाकलीवाल यांची फेर निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 25 जुलाई 2018

भारतीय जैन संघटना भोकरदन तालुका अध्यक्षपदी मयूर बाकलीवाल यांची फेर निवड.


भोकरदन प्रतिनिधि:- दि.२५ जुलै रोजी गुणनंदी भवन येथे भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष हस्तिमलजी बंब शहर अध्यक्ष शिखरचंद लोहाड़े व अल्पसंख्यक सेल चे प्रशिक्षक धनराज जैन यांनी नियुक्ति पत्र देऊन मयूर विजयकुमार बाकलीवाल यांची भारतीय जैन संघटना भोकरदन तालुका अध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली व नविन कार्यकरणी जाहिर करण्यात आली उपाध्यक्षपदी अमित खुळे,सचिवपदी संजोश बाकलीवाल, सहसचिवपदी गौरव जैन ,राकेश पानसरिया,कोषाद्यक्षपदी रोहित बाकलीवाल,सहकोषाद्यक्षपदी अमित लोहाड़े,डॉ.आकाश पांडे यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तथा अल्पसंख्यक समाज या हेतुने विद्यार्थ्याना शिष्यवृती बद्दल मार्गदर्शन करण्यात आले , कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलाससेठ बाकलीवाल प्रमुख उपस्थित  गटनेते संतोष अन्नदाते व समाजाचे प्रतिष्ठित नागरिक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पहाड़े मॅडम व आभार भावना बाकलीवाल यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें