सेलू :- मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने करूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने मराठा समाजाने आता बेमुदत ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसले असुन तालूक्यातील नव्वद गावे या आंदोलनात सहभागी होऊन लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दि. 30 जुलै पासून सकाळी 10 वाजता या आंदोलनाची तहसील कार्यालयावर सुरुवात होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली.
दोन गावे चोवीस तास अशा पध्दतीने नियोजन करून तहसील कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन होत असल्याने स्थानिक प्रशासनाची डोके दुखी वाढणार आहे. तालूक्यातील मराठा बहूल गावे अधिक असल्याने आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार असल्याचे स्पष्ट होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रात्र न् दिवस बेमुदत ठिय्या आंदोलन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येते.
आंदोलन स्थळी निवास व भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली असल्याचे मराठा मोर्चा समन्वयकांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें