लाडसावंगी परिसरात जनावरे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते.त्यामुळे शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली होती.२५ जुलै रोजी सांडू चव्हाण (रा.अंजनडोह, ता. औरंगाबाद)यांनी गट क्र.६३ मध्ये दिवसभर शेतात बैलाद्वारे शेतीत मशागत करून ते सायंकाळी साडेसहा वाजता घरी गेले.यावेळी त्यांनी दोन बैलासह इतर जनावरे शेतात बांधली होती.रात्री ११ वाजता जेवण करून ते शेतात परतले असता त्यांना खुंट्यावरील दोन बैल गायब झाल्याचे दिसून आले.त्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली.पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भिवसने, सहायक फौजदार ढवलसिंग महेर, जमादार रवींद्र साळवे, सुशीलकुमार बागुल, सचिन राठोड, संदीप जाधव,प्रभाकर जाधव यांनी करमाड-लाडसावंगी मार्गावर पाळत ठेऊन या मार्गाने जाणाऱ्या टेम्पो अशोक लेलंड (एम. एच.०४एफ पी ६२०५)ला अडविले.यावेळी टेम्पोमध्ये दोन बैल दिसून आले.पोलिसांनी चालकाला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हे बैल चोरून आणल्याचे सांगितले.त्यानंतर पोलिसांनी आरोपी टेम्पोचालक युसुफ कादर शेख (४७ रा. शहागंज औरंगाबाद) याच्याकडून अधिक माहिती घेतली असता दुसरा बैल चोर ताराचंद श्रीचंद राजपूत (४७ रा.अंजनडोह, ह.मु.लाडसावंगी)यास ताब्यात घेतले.यावेळी दोन्ही आरोपींनी २१ जुलै रोजी लाडसावंगी येथूनही दोन बैल चोरी केल्याचे कबुल केले.पोलिसांनी युसुफ शेख व ताराचंद राजपूत या दोन्ही आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली.अधिक तपास पोलीस निरीक्षक बी.पी.कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार ढवलसिंग महेर, सचिन राठोड करीत आहे.
फोटो:करमाड पोलिसांनी दोन जनावरे चोरांना अटक केली.यावेळी पोलीस निरीक्षक बी.पी.कोळी,सहायक फौजदार ढवलसिंग महेर, रमेश धस,रविंद्र साळवे,सचिन राठोड,संदीप जाधव, प्रभाकर जाधव,राहुल मोहतमल

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें